कुऱ्हे पानाचे येथील ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी व्हावी – शिवसेनेचे दिलीप सुरवाडे यांची मागणी.


भुसावळ- कुऱ्हे पानाचे येथील ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी व त्यांची त्वरित बदली करून कुऱ्हे ग्रामपंचायती ला न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी सरपंच यांनी केलेल्या आहेत. त्यावर म. मुख्याधिकारी, जि. प. जळगाव यांनी भुसावळ पं. समिती चे गटविकास अधिकारी पानझडे यांनी स्वतः समिती नेमून चौकशी करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी व्हावी असेही सुरवाडे यांनी म्हटले आहे.