भुसावळ -: येथील डी. एस. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 33 वर्षानंतर एकत्र येऊन वर्गशिक्षक आदरणीय श्री एम. एन. चोपडे सर आणि माजी मुख्याध्यापक जे. बी. राणे सर यांचा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती आणि शिक्षक दिनी निमित्त शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक रमेश पांडव यांनी केले. मालिनी तायडे , मार्था तायडे संगीता भोळे ,दिनेश भंगाळे यांनी आदरणीय शिक्षकांच्या प्रति असलेल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आपल्या शिक्षकांच्या प्रती असलेला आदर, सन्मान केला आहे. जीवनात आम्हीं आमच्या गुरुजनांमुळे यशस्वी झालो आहे. अशा भावना व्यक्त केल्या. 33 वर्षानंतर एकत्र येणे हा दुर्मिळ योगायोग आहे असे सांगितले ,आम्ही खूप भाग्यशाली आहोत असे प्राध्यापक लाभले.
कार्यक्रमाचे प्रसंगी एम. चोपडे सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आदर आणि सन्मान केल्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की जीवनात बोलताना, संयम राखावा, कुणाला दुखवू नये, चांगले उच्च विचार, साधी राहणी मान, जीवनात नेहमी ठेवा सकारात्मक भावना ठेवणे असे सांगितले . मुख्याध्यापक आदरणीय जे.बी.राणे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जळगाव येथील प्रसंग सांगून माजी विद्यार्थ्यांने अडचणीच्या प्रसंगी सरांना आपल्या स्वतःच्या कारमध्ये बसवून कुठे सोडायचे आहे असे विचारून इच्छित ठिकाणी व्यवस्थित नेले .या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना हृदय भरून आले. याप्रसंगी सौ. मुख्याध्यापिका संगीता राणे प. क कोटेचा माध्यमिक विद्यालय यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला . माजी विद्यार्थीनी शिक्षिका मालीनी तायडे आणि मार्था तायडे यांचाही सत्कार करण्यात आला . गेल्या 33 वर्षांनी सर्व विद्यार्थिनीनी विद्यार्थी एकत्र आल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद दिसत होता. या कार्यक्रमांमध्ये दिनेश भंगाळे, रमेश पांडव, सुरेश महाजन, गंगाधर पगारे, राजेश झोपे, नितीन महाजन, किरण सपकाळे, संगिता भोळे, पुष्पा चौधरी, शुभांगी चौधरी, मालिनी तायडे मार्था तायडे, राजश्री पांडव,मंगला जंगले सहभागी झाले होते.


