शेगांव -जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य -सहा एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार :


भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.
ब्लॉक दिनांक १०.०८.२०२४ रोजी
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यामध्ये बदल खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक १०.०८.२०२४ रोजी विभागात मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन – –
१) ०१२११ बडनेरा -नासिक विशेष ४० मिनिटे नियमित करण्यात येईल.
२) २२८४६ हटिया – पुणे एक्सप्रेस ०१ तास ४५ मिनिटे नियमित करण्यात येईल.
३) ११०४० गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ०१ तास ३० मिनिटे नियमित करण्यात येईल.
४) १२९९३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस ०१ तास ४५ मिनिटे नियमित करण्यात येईल.
५) १२४४० श्रीगंगानगर -नांदेड एक्सप्रेस ०१ तास १० मिनिटे नियमित करण्यात येईल.
६) ०१३६६ बडनेरा -भुसावळ मेमू ३० मिनिटे नियमित करण्यात येईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.