पुणे -मुज़फ़्फ़रपुर विशेष गाड्यांना मुदत वाढ :


प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा पुणे -मुज़फ़्फ़रपुर विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी पुढील प्रमाणे –
ट्रेन क्र. ०५२९० पुणे -मुज़फ़्फ़रपुर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०२.०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०५२८९ मुज़फ़्फ़रपुर – पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
आरक्षण: ट्रेन क्र. ०५२९० विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर दिनांक ०१.०८.२०२४ पासून सुरू होईल.
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.