भुसावळ – गेट टुगेदर , किटी पार्टी , स्नेहभोजन यासह अन्यम सामाजिक उपक्रम महिला नेहमीच करीत असतात मात्र ” आखाड पार्टी ” तीही सामूहिक ही अत्यंत सुंदर कल्पना उपाध्यक्षा सौ. प्रभाताई पाटील, यांना सुचली व त्यांनी
. सौ मंगला भिमराव पाटील व सौ.स्वाती प्रविण भोळे कोषाध्यक्ष यांचे कडे ही सुंदर कल्पना सांगितली . अन काय बघता बघता आखाड पार्टीचे नियोजन झाले व पार्टी ठरली . यासाठी सौ राजश्री कोलते, सचिव यांनी त्यांची कोलते फाउंडेशन संचलीत वर्ड स्कुल शाळा व सोबत दोन बसेसची व्यवस्था करून दिली आणि त्यांनी व त्यांच्या सुनेने कार्यक्रमाचे अगदी उत्तम नियोजन केले . रांगोळी पासुन ते सेल्फी पॉईंट पर्यंत अगदी उत्तम नियोजन त्यामुळे सदर पार्टीला रंगत आली. यात सहभागी होण्याचा मोह खिरोदा डिएड कॉलेजच्या प्राचार्या सौ प्रतिभा बोरोले यांनीही उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरवात सकल लेवा भजनी मंडळ भुसावळ यांनी स्वागत गित म्हणुन केली त्यात सहभागी दिप्ती चौधरी मेधा कुरकुरे व मैत्रीणी यांनी सादर केलेकार्यक्रमा वेळी कमेटी मेंबर वर्षा लोखंडे व अध्यक्षा मंगला पाटील यांनी लेवा गणबोलीतील नाटिका सादर केली तसेच चुलीस निवते भारती महाजन यांनी सादर केली यावेळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक नृत्य व खेळ खेळण्यात आले यात बलून पासींग गेम मध्ये प्रथम व्दितीय पारितोषक चारुलता महाजन यांनी स्पॉन्सर केले होते सर्व महिलानी खेळात सहभागी होऊन आनंद लुटला . ) खादय पार्टी कार्यक्रम नियोजनासाठी कोषाध्यक्ष सौ. स्वाती भोळे यांनी हिशोबासाठी व ऑनलाईन नोंदणी करीता अथक परिश्रम घेतले. व इतर सर्व मेंबर सौ. कावेरी चौधरी, सौ. किरण जावळे, सौ.वर्षा लोखंडे, सौ. मेघा कुरकुरे, सौ. वैशाली चौधरी, सौ.कल्पना शिंदे, सौ. संध्या भोळे, सौ.वैशाली पाटील, यांनी नियोजनासाठी सहकार्य केले. आखाड पार्टीत गव्हाची खीर, उडीद डाळीचे वडे , दही , , मिरची भजी, गुलगुले, बुंदी , भजे, मसाले भात, कढी अश्या चमचमीत खाद्यपदार्थांची मेजवणी होती . मंगला कोलते यांनी हे खुप चविष्ट व उत्कृष्ट असे जेवण बनविले होते. सकल लेवा समाज मंडळाच्या जवळपास १०० मैत्रिणी ता कार्यक्रमात सहभागी होत्या. कार्यक्रम अतिशय उत्साहात व निर्विघ्न पर पडला. सर्वांनी खुप आनंद लुटला.








