भुसावळ :- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती स्व. अशोक पंडित पाटील यांचे चिरंजीव पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयच्या आरोग्यदूत (भुसावळ तालुका प्रमुख) या पदावर पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष मा.खा. डॉ.उल्हास पाटील आणि गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती करण्यात आली आहे

पत्रकार हर्षल पाटील यांना गरीब रुग्णा विषयी लहानपणा पासुन च तळमळ असल्याने त्याच्या वर आरोग्यदूत म्हणून भुसावळ तालुकाध्यक्ष जबाबदारी दिली असल्याने पत्रकार हर्षल पाटील यांचे माजी आमदार संतोष चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल चौधरी, माजी सभापती सचिन चौधरी, महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र सिंग पाटील, देशदूत चे मुख्य उप संपादक संजय सिंग चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, सर्वोदय हायस्कूल चे मुख्याध्यापक एम एम चौधरी, समाजिक कार्यकर्ते हेमचंद्र पाटील/(छोटू भाऊ) पोलीस पाटील रतिलाल चौधरी , माजी सरपंच प्रदीप पाटील, माजी पोलीस पाटील श्रीकृष्ण चौधरी, माजी विकासो. चेअरमन शांताराम पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख, किशोर घुले (सर) जळगाव आरोग्यदूत ऋषिकेश महाजन, निलेश वाणी, शंकर पाटील, दिनेश पाटील, रायसिंग पाटील, प्रवीण पाटील. संदीप पाटील, मनोज पाटील, कैलास पाटील, विनायक पाटील, हिमेश पाटील, तुषार पाटील, उमंग पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.


