भुसावळकरांनी जल्लोषात धूलिवंदनाचा लूटला आनंद; कोरडया रंगासह डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद ; कोरोनाचे भितीने उत्साहावर विरजण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
राग, लोभ, मोह , मत्सर ,तिरस्कार अश्या दुर्गुणांची होळी करून दुसऱ्या दिवशी प्रेम, आनंद ,उत्साह, व समानतेचा संदेश देत विविध रंगांची उधळन करीत भुसावळकरांनी होलीकोत्सव व रंगोत्सवाचा आनंद जल्लोषात लूटला . यंदा सर्वत्र ‘कोरोना’ व्हायरस या रोगाचे सावट असल्याने अनेकांनी घरात राहण्यास अधिक पसंती दिली. कोरोनाचे भितीमुळे उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले .
तर अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसचे होळीत दहन करून शहरात अबालवृद्ध यांनी पाण्याची नासाडी होऊ न देता कोरडया व नैसर्गिक रंगाना प्राधान्य देवून मनसोक्त आनंद घेतला . महिलां व तरुणी यांनी सुद्धा मनमुराद रंगांची उधळन करीत उत्साहात धुळवड साजरी केली. तर अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाईने बेधुंद होऊन नाचत होळी साजरी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *