भुसावळ : शहरासह तालुक्यात निपुण अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, संख्या सेतू अभ्यास अन्वये 28 जून ते 10 जुलैपर्यंत तब्बल 20 दिवस शैक्षणिक कार्यक्रम राबवायचा असल्याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले. शहरातील रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालयात मंगळवार, 11 जूनपासून सकाळी 10 ते 1 या वेळात तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक आणि उपशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, तुषार प्रधान व केंद्रप्रमुख यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गात निपुण भारत शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2021, जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य विश्लेषण व नियोजन याची पीपीटी दाखविण्यात आली. निपुण सेतून अभ्यास 2024 भाषा व गणित घटक संच, समावेशीत शिक्षण पुस्तिका, केआरए निकष यावर वायकोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निपुण जळगाव अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान, संख्या सेतू अभ्यास 2024 अन्वये 28 जून ते 10 जुलै असे 20 दिवस प्रत्येक शाळेत राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्यात.



