लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली

रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवणार आहे:

ट्रेन क्र. 05326 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर दैनंदिन विशेष दि. ०२.०६.२०२४ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, जी आता दि. १०.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (८ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 05325 गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेष दि. ३१.०५.२०२४ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, जी आता दि. ०८.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (८ फेऱ्या)

वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरक्षण: ट्रेन क्रमांक 05326 विशेष फेऱ्यांसाठी बुकिंग दि. ०१.०६.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.