राजधानी सराफ कॉलेज ऑफ फार्मसी साकेगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )- यु.आय.सी.टी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे २८ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२० मध्ये
ओपन हाऊस कार्यक्रम घेण्यात आला .त्यात विविध कार्यक्रमात कै. यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांमध्ये
व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत व्दितीय पारितोषिक प्रसाद राजेंद्र जोशी याने मिळविले. निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक साक्षी गजानन कराले हीने मिळविले. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक धनश्री रामराव शिंदे हीने मिळविले. सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मयुर सुनिल महाजन याने मिळविले.रांगोळी स्पर्धेत प्रथम पारीतोषिक पोर्टर रांगोळी पल्लवी गणेश बोरसे तर प्रथम पारितोषिक संस्कार भारती रांगोळी मयुरी निळकंठ रायसिंग यांनी मिळविले.
विद्यापीठातील कार्यक्रमात जास्तीत जास्त पारितोषिक साकेगाव फार्मसी महाविदयालयातील मुला-मुलींनी पटकावले. यशस्वी विदयार्थ्याचे कौतुक तसेच अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष पी.डी.सराफ, संस्थेचे सचिव एस.पी.इंगळे, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.पाटिल यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापीका यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *