भुसावळात लोकसभा निवडणूकी करीता मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे तोंडी प्रशिक्षण :

भुसावळ - 

भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त( PRO )मतदान केंद्राध्यक्ष तसेच( FPO )प्रथम मतदान अधिकारीयांचे मॅाकड्रील प्रशिक्षण दि.12/04/2024 व दि. 15/04/2024 रोजी उपविभागिय अधिकारी यांचे कार्यालय (प्रांत कार्यालय) भुसावळ येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. तरी संबंधित PRO, FPO यांनी नियोजीत ठिकाणी हजर रहावे.
PRO, FPO यांचे मॅाकड्रील प्रशिक्षणानंतर लगेच आकलन व मुल्यामापन चाचणी होणार असुन ७०% टक्के पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या अनुर्त्तीर्ण होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणा साठी पुन्हा हजर राहावे लागेल.
जे अधिकारी कर्मचारी मॅाकड्रील प्रशिक्षणास गैरहजर राहतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.