जळगाव रामानंद नगरचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव –
जळगावच्या रामानंद पोलिस ठाण्याचा पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवार ३ रोजी रात्री दहा हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने पोलिस खात्यातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल भादवि कलम-307 च्या गुन्ह्यातील फिर्यादी असुन त्यांना ओलासे यांनी मी तुमच्या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाची कलमे लावलेली आहे. तसेच सदर केसमध्ये भक्कम पुरावा तयार करून केस मजबुत करण्याचे कारण सांगुन त्या मोबदल्यात आज दि.03/03/2020 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष 10,000/-रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वतः स्वीकारली. सदर कारवाई रामानंद नगर पोलीस स्टेशन समोर करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.
सुनिल कडासने ,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.
निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या नेतृत्वात पो नी. निलेश लोधी,पो नि.संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.ईश्वर धनगर, लाच प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या पथकाने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *