भुसावळ ( प्रतिनिधी ) –
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एस एस सी बोर्ड परिक्षेला मंगळवार दिनांक ३ मार्च पासून सुरुवात झाली. याअंतर्गत संपूर्ण भुसावळ तालुक्यातील ४,९३८ विदयार्थी परीक्षा देत आहे.दहावीची परीक्षा दि.३ ते २३ मार्च दरम्यान होंत असून १२ केंद्रावर नियमित व पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देत आहे.
तसेच भुसावळ शहरात सेंट अलॉयसेस मराठी माध्यम ५८२ विद्यार्थी,डी.एल.हिंदी हायस्कुल मराठी माध्यम २३७, हिंदी माध्यम १६९,संत गाडगेबाबा मराठी माध्यम २१५ ,हिंदी माध्यम ९६,उर्दू २२, डी.एस.हायस्कुल मराठी माध्यम ४४३, बियाणी स्कुल मराठी माध्यम १३०, हिंदी माध्यम ५२,सिंधी १,बी.झेड उर्दू स्कुल उर्दू माध्यम ५४४, वराडसीम मराठी माध्यम ४३०,म्युनिसिपल मराठी माध्यम ६४७ महात्मा गांधी विद्यालय वरणगाव मराठी माध्यम ४९७,नाथ विद्यालय (गंगाधर सांडू माध्यमिक विद्यालय) वरणगाव मराठी माध्यम १५०,उर्दू ९१,ऑडन्सस फॅक्टरी मराठी माध्यम २००,किन्ही हायस्कुल मराठी माध्यम ४३२ असे भुसावळ तालुक्यात एकूण ४९३८ विदयार्थ्यांचा समावेश आहे.
तालुक्यात दोन कस्टडी असून एक कस्टडी डी.एस.हायस्कुलमध्ये असून येथे
८ केंद्रांच्या ३५६८ विदयार्थ्यांचे परीक्षावर पर्यवेक्षक नरेंद्र चौधरी यांचे नियंत्रण ठेवून आहे तर दुसरी कस्टडी प्रधान वरणगाव कडे असून ४ केंद्रामध्ये १३७० विदयार्थी परीक्षा देत आहे.
.तहसीलदार दिपक धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रावर तपासणी करण्यासाठी दोन भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.त्यात तहसील कार्यालयातील एक पथक तर दुसरे पंचायत समितीचे पथक आहे.तालुक्यातील परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी.दिलीप भागवत, पो.नी.बाबासाहेब ठोंबे,पो.नी.रामकृष्ण कुंभार यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला.
भुसावळ कस्टडी अंतर्गत १६ कर्मचारी कार्यरत आहे. परिक्षक कस्टडीयन म्हणून जामनेरचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र चौधरी आहेत.त्यांना बी.एन. पाटील सहकार्य करित आहेत.तर वरणगाव येथे प्रधान सर नियंत्रण ठेवून आहे
विशेष पथकांद्वारे परीक्षेदरम्यान पथकांकडून पाहणी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी कॉपी किंवा समुह कॉपीचा प्रकार घड़लेला नसल्याचे सुत्राणी सांगितले .



