कृषीक्षेत्रातील संधी शोधून युवतींनी उद्योजक व्हा, आत्मनिर्भर व्हा – नाना पाटील सर


भुसावळ –
कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रम दिनांक 18 /1 /2024 पासून महाविद्यालयात सुरू झाले त्या अंतर्गत प्रथम सत्रात श्री गुलशन कुमार ब्रांच मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र भुसावळ यांनी बँक व्यवहारांसंबंधी युवतींमध्ये जनजागृती केली त्यामध्ये विविध खाती आरटीजीएस एनईएफटी युपीआय यासंबंधीची विस्तृत माहिती दिली तसेच हॅकर्स कशा पद्धतीने खातेधारकांची फसवणूक करतात व ती रोखण्यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली तर
दुसऱ्या सत्रात शैक्षिक आगाज व पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष नाना शंकर पाटील सर यांनी कृषी संदर्भातील विविध योजनांची माहिती दिली व योग्य वेळी मार्केटींग च्या संधी बघून असे उद्योग उभे करून उद्योजिका व्हा शासनाने अनेक योजना कृषी आधारित महिलांसाठी सुरु केलेल्या आहेत ज्यात केंद्रशासन 60% तर राज्य शासन 40% अनुदान देते युवती व महिला साठी शासनाने आत्मनिर्भर सारख्या योजना राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे . व कृषीच्या योजनेसाठी 5 लाख ते 20 लाख कर्ज केवळ 4% व्याजाने दिले जाते ज्याद्वारे युवतींना कसे आत्मनिर्भर होता येईल याची माहिती सांगितली तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून कचरा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी फालक यांनी आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व युवतींनी अभियानामध्ये उत्साहाने सामील होण्याचे आवाहन केले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा संगीता धर्माधिकारी ,सूत्रसंचालन डॉ माधुरी पाटील व आभार प्रदर्शन प्रा आर डी भोळे यांनी केले कार्यक्रमासाठी डॉ ए आर सावळे डॉ जे पी सरोदे डॉए के पाटील व प्रा एस एन चौधरी गायत्री नेमाडे सुशीला भट उपस्थित होते ‎