जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलीस अधिक्षक उगलेंचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलिस अधीक्षक उगले यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील , वरणगांव नगरपरिषद गट नेते राजेन्द्र विश्वनाथ चौधरी , सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष अरविंद मानकरी,भुसावळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिपक मराठे , ओबीसी तालुका अध्यक्ष गजानन वंजारी, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस पप्पू भाई जकातदार, तालुका उपाध्यक्ष राजेश चौधरी , चंदु चौधरी,संजय चौहान, उज्ज्वल पाटील, आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *