भुसावळ – सातारा येथील समाजसेवक, पाच हौशी सायकलस्वारांनी सांगली ते अटारी (वाघा) बॉर्डर परत बॉर्डर ते सातारा असा हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलने करून जनमानसात एक संदेश दिला. सायकल चालवा निरोगी रहा, व तसेच प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी लोकांना आपले अनुभव कथन केले . तसेच निरोगी राहण्यासाठी शुद्ध हवा, सायकल चालवणे, संवाद वाढवणे, व तसेच हसत राहून आपली जीवनशैली निर्माण करा असं नमूद केले. त्यांनी ओंकारेश्वर ,जयपुर,अजमेर, चित्तोडगड,ओंकारेश्वर, हरियाणातील विविध शहरात ,चंदिगड वगैरे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून सुद्धा त्यांनी प्रवास करत असताना कुर्हे पानाचे येथील ललवाणी फार्मला भेट देऊन काही काळ व्यतीत केला. त्यांनी प्रा.डाँ. डी.एम.ललवाणी यांच्याशी हितगुज करताना अनेक बाबीवर प्रकाशझोत टाकला. प्रा. ललवाणी यांनी गोशाळा सुरू करण्याचा केलेला संकल्प पाहून ते हर्षभरीत झाले. त्यांनी ईथे सुरु असलेल्या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. या वयात सुद्धा त्यांच्या कामाची ऊर्जा बघून आपणास सुद्धा उत्साह निर्माण होतो असे नमूद केले. प्रा. ललवणी यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अंबरीश जोशी, विनोद दीक्षित,विजय वरुडे,शिवाजी कणसे,किशोर माने असे हे पाच सायकल स्वार होते. सर्वजण विवीध क्षेत्रात कार्यरत असतांना सुध्दा त्यांनी हा छंद जोपासला असुन गेल्या ५ वर्षापासुन ते सफर करीत आहेत.त्यांनी अनेक किस्से सांगून भारत देश हा सुसंस्कृत. सुजाण व नेहमीच मदतीस तयार असणार्या माणसांचा देश असल्याचे नमूद केले. त्यांना विविध राज्यातील लोकांनी सहकार्य केले त्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आलेल्या अडचणीवर मात करून सुद्धा त्यांनी मार्गक्रमण केले .पुढील वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करण्यचा त्यांचा बेत असल्याचे त्यांनी नमूद केले.



