जळगाव – जळगाव जिल्ह्यात प्रथमता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे येत असून यांच्या सभेची जय्यत तयारी झाली असून मराठा समाज हा आमचा मोठा बंधू आहे. मराठा समाज व ओबीसी समाज हा जळगाव जिल्हा मध्ये गुण्या- गोविंदाने राहत आहेत मात्र या ठिकाणी मनोज जरांगे हे त्यांचे भाषणातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपण यावं आपल्या समाजासाठी आरक्षण मागाव मात्र आरक्षणासाठी बोलताना ओबीसी समाजाच्या भावना दुखावतील तसेच मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करू नये अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी केली आहे.
मराठा समाज हा आमचा मोठा बंधू असून आमच्या मोठ्या बंधू ला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची वैयक्तिक भावना असून आमच्या मोठे बंधूंनी आमच्यात हिस्सेदारी करू नये अशी लहान बंधूंची मोठ्या बंधूंकडे मागणी आहे.
मात्र मोठ्या भावाने आरक्षणाचा हट्ट धरून लहान भावाचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न करू नये . अशी देखील भावना ओबीसी बांधवांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


