भुसावळ -भुसावळ नगरपरिषद येथे लाड समितीच्या शिफारसीनुसार दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे चारित्र्य पडताळणी बनावट प्रमाणपत्र देवून नोकरीवर आहे. याबाबत रितसर चौकशी करून त्यांच्यांवर शिस्तभंग व ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका सोनी बारसे व संतोष बारसे यांनी केली आहे.
शहरातील एका राजकीय जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या पुढार्याचा वरदहस्त आहे. असा आरोप यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केला आहे. शहरातील नगरपरिषदेत लाड समितीच्या शिफारसीनुसार आकाश रायसिंग पंडीत व धरमसिंग रायसिंग पंडीत यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. ही नियुक्ती बनावट चारित्र्य पडताळणी आधारे झालेली आहे. याबाबत माजी नगरसेविका सोनी संतोष बारसे यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी तक्रार केली होती. मात्र त्याची दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. तक्रारी अर्जात नमूद केल्याप्रमाणे नियुक्तीदरम्यान सादर कलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे बोगस (बनावटी) असल्याबाबतची तक्रार अर्जाद्वारे केली आहे. आकाश रायसिंग पंडीत व धरमसिंग रायसिंग पंडीत यांनी भुसावळ नगरपरिषदेत नियुक्तीच्यावेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे बोगस (बनावट) सादर केले. हे बनावट प्रमाणपत्राचे स्वयंस्पष्ट अहवाल देण्यात यावा, तसेच आकाश पंडीत, धरमसिंग पंडीत यांच्यावर बाजार पोलिस स्टेशन व शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, अशी तक्रार मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे बारसे यांनी केली आहे.
याबाबत माहितीच्या अधिकाराखाली सोनी बारसे यांनी माहिती मागितली असता आजपावेतो माहिती दिली नाही. येत्या सोमवार २० नोव्हेंबर रोजी पर्यंत माहिती न दिली गेल्यास याबाबत उच्च न्यायालयात (हायकोर्ट) याचिका दाखल करण्यात येणार आहे. नगर परिषदेत रुजू झाल्यापासून जे वेतन घेतले आहे. ते या दोघांकडून वसूल करून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करून ४२० चा गुन्हा आकाश पंडीत व धरमसिंग पंडीत यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अद्याप पावेतो कोणतीही माहिती माहिती अधिकार मिळाली नाही. याबाबत रितसर चौकशी करण्यात यावी, न केल्यास हा लढा सुरूच राहणार आहे. यासंबंधी चारित्र्य पडताळणी बनावट प्रमाणपत्र यांना कस मिळाले, यामागे कुणाचे षडयंत्र आहे. याचा शोध लागणे गरेजेचे आहे. शहरातील एका जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या पुढार्याचा नोकरीत कार्यरत असलेल्यांंवर आशिर्वाद असल्याचा आरोप माजी नगरसेविका सोनी बारसे व संतोष बारसे यांनी वाल्मीकनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.



