राजा महाराष्ट्र मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-
राजा महाराष्ट्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यान ऑर्डनन्स इस्टेट भुसावळ येथे १९ फेब्रूवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम महाप्रबंधक राजीव पूरी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळयाचे विधीवत पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.तसेच सर्व मान्यवरांनी सुद्धा माल्यार्पण अर्पण करीत महाराजांना मुजरा केला .यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे महाराष्ट्र मंडळ यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. यानंतर शिवचरित्रावर भाषणे झाली.
यावेळी ऑ फॅ भुसावळ चे महाप्रबंधक राजीव पूरी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष .रमेश पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
अप्पर महाप्रबंधक वसंत निमजे, सुरक्षा अधिकारी देशपांडे , अकाऊंट ऑफिसर अनंत मूर्ती , फॅक्ट्ररीचे प्रशासकिय
अधिकारी तरुण कुमार उपस्थित होते. ऑ फॅ भुसावळ येथील आयुध निर्माणी कर्मचारी संघ, ऑ फॅ कामगार युनियन, ऑ फं मजदूर युनियन, बहुजन सुरक्षा कर्मचारी संघ, एस सी एस टी असो., क्लेरिकल असो., सुपरवायझर असो., एनजीओ असो., बौध्द मंडळ, महर्षि वाल्मिक मंडळ, ओम महर्षि वाल्मिक मंडळचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी, ऑ.फॅ.एम्प.को.ऑप.क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सच्चानंद गोधवानी व संचालक, राजर्षि शाह प्रतिष्ठानचे बाविस्कर व साहेबराव पाटील उपस्थित होते.
आयुध निर्माणी कर्मचारी संघातर्फे .किशोर सुर्यवंशी, ऑ फॅ कामगार युनियन तर्फे गजानन इंगळे, ऑ फॅ मजदूर युनियन तर्फे मनिष पवार, बहुजन सुरक्षा कर्मचारी संघ तर्फे प्रशांत निकम, एस सी एस टी असो. तर्फे सुर्यभान गाढे , कु.साक्षी पंकज पाटील, अप्पर महाप्रबंधक वसंत निमजे आणि .महाप्रबंधक राजीव पूरी यांचे भाषण झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे केंद्रिय कार्यकारणी सदस्य .प्रकाश कदम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सतिश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक आंबोडकर, प्रशांत सोनवणे, शेखर सुर्यवंशी, विनोद महाजन, तुषार बडगुजर, वसंत पाटील, राकेश शिर्के, केतन पाटील, जयसिंग कदम, अमोल पाटील, ईश्वर चौधरी, विवेक कदम, रमेश सुरवाडे, रावसाहेब पाटील, संतोष जाधव, सत्यवान बिन्द्रा, नितीन देशमुख, राजू बादशाहा, संदिप पाटील, किशोर पाटील, पी बी महाजन, किरण बावस्कर,अरुण पाटील, लक्ष्मण वाघ, दिपक ढेमे, चेतन चौधरी, लक्ष्मण पाटील, रवि ठाकरे, चंदू बोरसे, गणेश बाविस्कर, गिरीष येवले, संदिप चौधरी, रितेश तायडे, मिलींद अडकमोल, सागर तायडे, महेंद्र तायडे, एस एस राऊत तसेच महाराष्ट्र मंडळाच्या सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *