भुसावळ (प्रतिनिधी)
भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामान्य ज्ञानाचा विकास व्हावा व स्पर्धेच्या युगात ग्रामिण भागातील विद्यार्थी टिकावा यासाठी केंद्र प्रमुख संजय श्रीखंडे यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा हा उपक्रम राबविला.ही परिक्षा भुसावळ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात आली . प्रश्र्न पत्रिका व नियोजन गोजोरे शाळेतील उपशिक्षिका सौ भाग्यश्री लोहार ,सौ निशा पाटील , श्रीमती क्रांती पाटील यांनी केले . यावेळी भुसावळ गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान ,शिक्षण विभाग अधिकारी सौ रागिणी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ मनिषा पाटील यांनी सुनसगाव व गोजोरे शाळेत भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले . शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतांना अशा परिक्षा नेहमी घेतल्या जाव्यात अशा सुचना केल्या. यावेळी केंद्र प्रमुख संजय श्रीखंडे , सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, सुनसगाव मुख्याध्यापिका वंदना पाटील , अरुणा सोनवणे ,सरला जावळे , लता गालफाडे तसेच गोजोरा शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र पाटील , भाग्यश्री लोहार, निशा पाटील,क्रांती पाटील, शोभा चौधरी ,बाळू कोळी व विद्यार्थी उपस्थित होते.



