मुक्ताईनगर –
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी साडेतीन वाजता संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळील रस्त्यावर विराट शेतकरी मेळावा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय दौर्याविषयी प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे.
दौरा याप्रमाणे शनिवारी दुपारी 12.40 वाजता नंदूरबार हेलीपॅड येथून हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण, दुपारी 1.20 वाजता जैन हिल्स हेलिपॅड, जळगाव येथे आगमन, दुपारी 1.25 वाजता मोटारीने जैन हिल्सकडे प्रयाण, दुपारी 1.30 वसाजता आकाश, जैन हिल्स येथे आगमन, दुपारी 1.30 पद्यश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा तसेच दुपारी 3.00 वाजता मोटारीने जैन हिल्स हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 3.05 वाजता जैन हिल्स हेलिपॅडवर आगमन, दुपारी 3.10 हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण तसेच दुपारी 3.25 वाजता संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर येथे आगमन. दुपारी 3.30 मोटारीने सभास्थळ संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, बर्हाणपुर रोडकडे प्रयाण, दुपारी 3.35 वाजता सभास्थळ, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान येथे आगमन. दुपारी 3.35 वाजता भव्य शेतकरी मेळावा, सायंकाळी 4.45 वाजता मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, सायंकाळी 4.50 वाजता हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4.55वाजता हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वाजता, जळगाव विमानतळ येथे आगमन सेच सायंकाळी 5.15 वाजता विमानाने नाशिककडे प्रयाण होईल.



