रिपाइं(आठवले)गटात अनेकांचा प्रवेश

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील लॉन मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत समाज कल्‍याण राज्‍यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसाद नायडू,राजेश नायडू,दत्त कुमार, नारायण स्वामी मदले यांच्‍यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रसंगी खान्‍देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर दंडवेकर,युवा नेते पप्पू सुरडकर,विश्वास खरात,प्रकाश सोनवणे,भिमराव वाघ,यांच्‍यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
यात रिपाई तालुका उपाध्‍यक्षपदी राजेश नायडू यांची तर मन्‍नेवार समाज आघाडी जिल्‍हाध्‍यक्षपदी दत्तकुमार मदले यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
जळगांव जिल्ह्यात लवकरच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याचे जाहीर करण्‍यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *