भुसावळ : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती भुसावळ तालुक्यातील खडका कार्यालयात स्वीकारणार्या साकरी येथील तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स-२ व खरेदीखत घेऊन ७/१२ उताऱ्यावर नाव लावणेसाठीच्या विहीत अर्जासह खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ कार्यालयात अर्ज सादर केला असता वरील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेण्याच्या व ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३००/-रुपये लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पोना.बाळू मराठे,पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी. यांनी
हा सापळा यशस्वी करण्यात आला.


