भुसावळातील महिला नगरसेविकेच्या पुढाकाराने प्रभागात ढाप्यांसह पेव्हर ब्लॉक बसविले

भुसावळ (प्रतिनिधी )-
समाजाचे आपणही देणं लागतो या उदात्त भावनेतून शहरातील प्रभाग क्रमांक 21 च्या भाजप नगरसेविका पुष्पा रमेशलाल बतरा व माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी स्वखर्चातून तब्बल सव्वादोन लाखांची विकासकामे पूर्ण केल्याने नागरीकांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.या कामांमुळे नागरीकांना मिळाला दिलासा
प्रामुख्याने शाळांना जोडणारा रस्ता, तब्बल 216 मीटर लांबीच्या गटारी व पाच ठिकाणी ढाप्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सामाजिक भावनेतून नगरसेविका पुष्पा बतरा यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 21 मधील आदर्श सिंधी शाळेला जोडणाऱ्या रस्त्यावर 30 ब्रासचे पेव्हर ब्लॉक बसवले. सिंधी कॉलनीतून आदर्श स्कूलमध्ये जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होतो. तर उन्हाळ्यात रस्ता धुळीने माखतो. आता पेव्हर ब्लॉक बसवल्याने विद्यार्थ्यांना तसेच या मार्गावरील रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे. यासोबतच माजी उपनगराध्यक्ष भगवानदास बढेजा यांच्या घराजवळ 116 फुट लांब गटार व 16 फुट लांबीचा ढापा देखील स्वखर्चातून केला. त्रिलोक मनवानी यांच्या घराच्या मागील परिसरात 100 फुट गटारीचे काम स्वखर्चातून करण्यात आले. यामुळे पाण्याचा निचरा शक्य झाला. बतरा यांनी 5 ठिकाणी ढापे तयार केले. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी पेव्हर ब्लॉक व स्वच्छतेसाठी 216 मीटर गटारींचे काम व ढाप्यांची दुरुस्ती झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला असून पालिकेच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 21 मध्ये अनेक कामे पूर्ण केली आहेत मात्र काही कामे सामाजिक भावनेतून करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका पुष्पा बतरा यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *