भुसावळ वरणगाव रोडवरील फेकरी नाक्यावर होते प्रवाशांची लुट –

भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ वरणगाव रोडवर असलेल्या फेकरी टोल नाक्यावर राञीच्या वेळी काही टवाळखोर व्यक्तींकडून लुट होत आहे.
या रस्त्याने राञीच्या वेळी जाणाऱ्या वाहनांना अडवून चालकाला धमकावून त्यांची आर्थिक लुट केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. बाहेर गावांच्या चालकांची या प्रकारामुळे आर्थिक लुट तसेच मोबाईल हिसकावून टवाळखोर पोबारा करीत आहे.

शासनाच्या काही नियमानुसार फेकरी टोल नाका बंद करण्यात आला आहे. जेव्हा टोल नाका सुरू होता त्यावेळी राञंदिवस याठिकाणी कर्मचाऱ्यांची वर्दळ होती. मात्र काही महिन्यांपासून हा टोलनाका बंद झाला असल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी सूमसाम असते .त्याचा फायदा घेऊन हे टवाळखोर चालकांची लूट करीत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे .या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.
अन्यथा या ठिकाणी काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही लोकांनी म्हटले आहे .