भुसावळ : येथील ‘खान्देश लाईव्ह न्युज’ कार्यालयाचे नुकतेच
प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, न.प.मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी तहसीलदार दिपक धिवरे, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय घेरडे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू भाऊ कोठारी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी तसेच भुसावळ शहरातील ईलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडियाचे पत्रकार बांधव व राजकीय , सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी उपस्थित होते.


