भुसावळ / शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असंख्य कार्यकर्ते २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वा. अमरदिप टॉकीज चौक येथे पक्ष प्रवेश करणार आहेत तसेच जाम मोहल्ला, कलाली बाडा येथे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचा आणि लोकमानसही ठाकरेंना अनुकूल असल्याने शिवसेना भवनातून जळगाव जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे व त्यानुसारच रणनीती तयार करण्यात आली आहे असे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी कळविले आहे.
भुसावळ शहरासह तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात इनकमिंग वाढले असून, आगामी निवडणुकांत या पक्षाला चांगले भवितव्य असल्याने, भाजपसह व इतर पक्षाचे कार्यकर्तेदेखील या पक्षात येण्यास इच्छुक आहेत अशी माहिती शहर समन्वयक नमा शर्मा यांनी दिली आहे.
संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सह समन्वयक उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक संजय ब्राम्हणे व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेलकामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, शिक्षक सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख,शहर प्रमुख व शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.



