भुसावळ – १५ ऑगष्ट रोज़ी स्वतंत्रता दिवसाच्या ७५ व्या अमृत महोत्सव व स्वतंत्रता दिवस प्रति वर्षी प्रमाणे अत्यंत हर्षोल्हासात व आंनदाने साजरा करण्यात आला .
मागील 10 वर्षा पासून शिव मंडळ,शिव प्रतिष्ठान व शिवसेना शाखा लक्ष्मी चौक मित्र परिवार उमाकांत शर्मा (नमा) यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . सोमवार रोजी सकाळी 8 वाजता भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी बूंदी लाडूचा नैवदय दाखवुन सर्वाना बूंदी लाडू वाटप करण्यात आले.
या नतर येणाऱ्या-जाणारे सर्व भुसावळकर नागरिकांना तिरंगा ध्वज स्टिकर देण्यात आले. आणि लहान मुलांना पेन , चॉकलेट, खेळणी, खाऊ वाटप करून तिरंगा ध्वज व स्टिकर वाटप करण्यात आले नंतर सकाळी ११ वाजता शिव मंडळाचे सर्व सदस्य व महिला नारी शक्ति सोनल शर्मा, मेघा वैष्णव ,राज भराडिया,जे बी कोटेचा, नितिन शर्मा, सर्वानी हातात तिरंगा ध्वज घेऊन राम मंदिर ते बालाजी मंदिर, गांधी चौक, भजिया गल्ली ते सराफ बाज़ार ते लक्ष्मी चौक पर्यंत तिरंगा रॅली काढून भारत माता की जय, जय जवान जय किसान,वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमला .
या प्रसंगी माज़ी नगरसेवक दिनेश राठी, देवा वाणी, मुकेश गुंजाळ , उमाकांत शर्मा (नमा),रामवल्लभ झवर,महेंद्र जैन, गोपाल चांडक, कैलाश अग्रवाल, सुनील अग्रवाल, महेश झवर, पूजन महाजन, आदित्य शर्मा, संजय ठाकुर, अजय चौरसिया,शुभम चौरसिया, निखिल नगरे,श्याम अग्रवाल पीयूष शर्मा आदि उपस्थित होते



