भुसावळ – भारताची फाळणी ही कुटनिती इंग्रजांची” प्रा. डॉ. पंकजकुमार प्रेमसागर आज स्वातंत्र्याच्या 75 री मध्ये संपूर्ण भारत न्हाऊन निघाला आहे.’ हर घर तिरंगा’ अंतर्गत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा मोठ्या दिमाखात डौलत आहे .केंद्र सरकार, राज्य सरकार, उच्च शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये शाळा, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज भुसावळ येथील. कला ,विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 14 ऑगस्ट “विभाजन विभिषिका स्मृतिदिन” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सौ .एम .व्ही. वायकोळे ,प्रमुख वक्ते डॉ. पंकज कुमार प्रेमसागर ,इतिहास विभाग प्रमुख ,मुक्ताईनगर होते .यांच्या समवेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ. एन .ई .भंगाळे डॉ. पी.एच. इंगोले ,पर्यवेक्षिका श्रीमती शोभा तळेले, प्रा. वाय .एम .पाटील उपस्थित होते .भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर डॉ. पंकजकुमार प्रेमसागर यांनी सभागृहाला मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 1947 पर्यंतचा लेखाजोखासह सभागृहासमोर मांडला त्यात त्यांनी प्लासीची लढाई ,बक्सारची लढाई, 1857 चा उठाव ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ,मुस्लिम लीग ,बंगालची फाळणी, लखनऊ करार व महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू ,सरदार वल्लभाई पटेल, बॅ. महमद अली जिना इत्यादींच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मते, भारताच्या फाळणीस ब्रिटिश व त्यांची फोडा व राज्य करा ही नितीच जबाबदार होती. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एम .व्ही. वायकोळे यांनी अध्यक्षीय समारोप केला त्यात त्यांनी स्वातंत्र्याची 75 री आपण साजरी करीत असताना स्वातंत्र्याच्या पूर्वकाळातील इतिहास जाणून घेणे हे किती गरजेचे आहे याची आठवण करून दिली ,जोपर्यंत आपल्याला आणि येणाऱ्या नव्या पिढीला खरा इतिहास कळत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही अशी माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली त्यानंतर भारत-पाक फाळणीच्या वेळेस ज्यांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले अशांसाठी श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद अहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जे . एफ. पाटील डॉ. किरण वारके ,प्रा. एस.टी .धूम,प्रा.प्रशांत पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी कनिष्ठव वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.



