भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली तर्फे मैत्री दिनानिमित आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. फ्रेंडशिप डे निमित्त
रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली आयोजित एरोबिक्स ताप्ती स्कुल ग्राउंड वर ५५ माहिलांना फ्रेंडशिप बेल्ट बांधून दिला ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वात जास्त मदत झाडांचे होते म्हणून आपला खरा मित्र हा वृक्ष वृक्ष असल्याने वृक्ष संवर्धन म्हणून वृक्षाला बी बियांपासून बनवलेली विशेष राख्या बांधण्यात आल्या तसेच फ्रेंडशिप बेल्ट सुद्धा बांधण्यात आले. एरोबिक्स करून शरीराची काळजी घ्यावी हा संदेश महिलांपर्यंत देण्यात आला.यावेळी
पीडीजी राजीव शर्मा,अध्यक्षा नूतन फालक,सेक्रेटरी मनीषा पाटील,डॉ रश्मी शर्मा,
धर्मेंद्र मेंडकी,हिरामन फालक आदी उपस्थित होते. यावेळी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.



