भुसावळ – शहरातील दीनदयाल नगर बहुउद्देशीय नगर परिषद समाज मंदिर जवळ सार्वजनिक रस्त्यावर आरोपी गैरकायदा व विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगून फिरतांना मिळून आल्याने कुख्यात आरोपीकडून बाजारपेठ पोलिसांनी पिस्टल हस्तगत करीत आरोपी अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी निलेश बाबूलाल चौधरी नेमणूक बाजारपेठ पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २६/०६/२०२२ रोजी १०.१० वाजता दीनदयाल नगर बहुउद्देशीय नगर परिषद समाज मंदिर जवळ सार्वजनिक रस्त्यावर लाईटच्या उजेडात भुसावळ शहरात आरोपी तस्लिम उर्फे काल्या सलिम शेख वय २६ राहणार दीनदयाल नगर भुसावळ हा गैरकायदा व विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल स्वतःचे कब्जात १५ हजार रुपये किंमतीची बाळगून फिरतांना मिळून आला म्हणून पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या आदेशावरून गुरुन ००४/२०२२ कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुदर्शन वाघमारे करीत आहे.
सदरची कारवाई विजय नेरकर, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी,तेजस पारसकर,उमाकांत पाटील,प्रशांत सोनार, योगेश माळी, सचिन पोळ,सचिन चौधरी अशांनी मिळून केली.


