भुसावळात आगामी निवडणुकीत भगवा फडकवा- विलास पारकर : शिवसेना आढावा बैठक संपन्न !


भुसावळ – येथील ब्राम्हण संघ येथे सायंकाळी भुसावळ शिवसेना विधानसभा क्षेत्र आढावा बैठक संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या उपस्थिती संपन्न झाली.

गद्दारांना धंदा शिकविण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली आहे. सर्वात आधी छगन भुजबळ १४ आमदार घेऊन गेले होते नारायण राणे १२ आमदार घेऊन गेले. त्यावेळी शिवसेना मागे हटली नाही.जे आमदार आज शिवसेना सोडून गेले त्यांचे मरण उद्या अटळ आहे. आमच्या साठी हे काही नवीन नाही. संघटना कशी वाढवायची आहे हे आम्हाला चांगले प्रकारे माहीत आहे.शिवसेना ही मर्दांची आहे बाळासाहेबांची आहे.जे निष्ठावंत आहे ते संघटनेत आहे व जे निष्ठावंत नाही ते वाहून गेले आहे.सर्व ईडी,सीडी,इनकम टॅक्स,सी.बी.आय. चौकशीच्या भीतीपोटी हे सर्व आमदार पळाले.

मोदी याची मनापासून इच्छा आहे शिवसेना संपली पाहिजे.अख्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी एकच पक्ष आहे त्याला संपविण्याच्या मागावर आहे.शिवसेनेचे ४० आमदार पळाले ती ५० कोटीच्या लालसेने गेली.आमच्या पक्षात न आल्यास तुमची ईडी लावणार या भीतीने आमदार पळाले.जे भाजपात गेले त्यांची ईडी चूप करण्यात आली मग यांची का चौकशी करण्यात आली नाही.अशा धमक्यांना बळी पडायचे नसून भुसावळ शहरात आगामी निवडणुकीत भगवा फडकवायचा आहे.

ज्यांना मातोश्री ने आशिर्वाद दिला टपरी वाले मंत्री झाले रिक्षा चालक मंत्री झाले हे सर्व मातोश्री मुळे शक्य झाले.

लोक प्रतिनिधी येणार व जाणार बंडखोरी करणे गद्दारी करणे हे शिवसेनेला असे अनेक अनुभव आहेत.जे गद्दार गेले त्यामुळे आता नवीन लोकांसाठी संधी चालून आली आहे.आपल्या पाठीशी बाळासाहेब आहेत.पुढे जाऊन संघटनेला वाढवायची आहे.वकरात लवकर भुसावळ विधानसभेचे पदे जाहीर करा काम न केल्यास पदे काढून घेणार अशी तंबी ही दिली.शिवसेना सोबत बंड करणारे टिकले नाही.नारायण राणेंनी दादागिरी मोठ्या प्रमाणात होती.शिवसेनेने त्यांना निवडणुकीत बरोबर त्यांची जागा त्यांना दाखविली.राज ठाकरेंचा एक आमदार पुढे तो असे किंवा नाही हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल.हिंदुत्ववादी भूमिका बदलली नाही. आमची भूमिका ठाम आहे.सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करा कोणाचाही द्वेष करू नका