ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे अंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा :


भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे दिनांक 21 जून 2021 रोजी सकाळी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
या प्रसंगी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार व दीपशिखा महीला कल्यान समिती उपाध्यक्ष श्रीमती सुदिप्ता सरकार यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता ॐ च्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात केली
या प्रसंगी सुरक्षा अधिकारी सुशीलकुमार व बी देवीचंद डीजीएम आणि महिला कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी महिलांनी ॐच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले यावेळी कार्यक्रमाला सर्व अधिकारी सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जेसीएम थ्री.जेसीएम फोर्थ मेंबर कार्यसमिति सदस्य व डीएससीचे जवान
सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली यावेळी योग प्रशिक्षक
एम एस राऊत यांनी सर्वांना योगसाधने चे धडे दिले आपल्या भाषणात (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार म्हणाले की आज जसे मोठ्या संख्येने व उत्साहात योगाभ्यास केला तसा प्रत्येक दिवशी योगाअभ्यास करून प्रत्येकाने आपले शरीर निरोगी व निरामय आयुष्य जगावे योग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे म्हणून रोज योग करने आवश्यक आहे

असी माहिती भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे पीआरओ बी देवीचंद डीजीएम यांनी दिली .