मुंबई – देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.

तसेच पुढे राजेश टोपे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ आलेख कमी होतोय या भ्रमात राहू नका राज्यात आज 46 हजार रुग्णांची नोंद झाली आहे . 2 लाख 75 हजारांच्या दरम्यान राज्यात सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना रूग्ण कमी झाले असा नाही. महाराष्ट्रातील पॉझिटिव्हिटी रेट 21.4 टक्के आहे, तर मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट 27 टक्क्यांच्या जास्त दाखवला आहे. दिलासादायकबाब म्हणजे संख्या वाढत असेल तरी 86 टक्के रुग्ण होमक्वारंटाईन आहेत.
शाळेच्याबाबतीत प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामीण भागात जी काही रुग्णांची संख्या वाढत आहे. मराठा, विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण 15 ते 20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय व्हावा अशाच पद्धतीचे चर्चेच्या अंती निर्णय झाला आहे. शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ शकेल,’ असे राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण राज्यात शाळा सरसकट बंद केल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. लसीकरणाचं प्रमाण घटत असल्यामुळे कडक पावले उचलावी लागतील. लसीकरणासाठी राज्य पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे.राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे.कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीती बाळगण्याचं कारण नाही. परंतु, काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.


