औरंगाबाद – येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने २०२०-२१ चे ‘रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ व ‘यमुनाताई नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार’ ची घोषणा महासंघाचे अध्यक्ष समाधान दहिवाळ यांनी सोमवारी ( २२ नोव्हेंबर) केली. रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार : शशिकांत लोखंडे मुंबई, ( समीक्षाग्रंथ : मराठीतील सत्य शिव आणि सौदर्यं विचार), सुनील चंदनशिवे कोल्हापूर (कवितासंग्रह : आंबेडकरी कविता), रमेश गोपनाराायण अकोला ( वैचारिक ग्रंथ : धम्मदृष्टी ), अशोक पवार औरंगाबाद ( संशोधन ग्रंथ : बंजारा समाजाचा स्वर्णिम इतिहास), छबुराव भांडवलकर जालना ( कथासंग्रह : हुरहुर), प्रवीण पंडित परभणी ( कवितासंग्रह : पहिलं पान), नामदेव चव्हाण सोलापूर ( आत्मकथन : लदणी), डॉ. विशाल इंगोले बुलढाणा ( कवितासंग्रह : माझ्या ह्यातीचा दाखला), डॉ. शिवाजी शिंदे सोलापूर ( कवितासंग्रह : कैवार), भास्कर बडे लातूर ( कथासंग्रह : बाईचा दगड), ईश्वर हलगरे रत्नागिरी ( कांदबरी : आरसा), तर यमुनाताई नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार : उषा हिंगोणेकर जळगाव (कवितासंग्रह : धगधगते तळघर), ज्योती सोनवणे औरंगाबाद ( कवितासंग्रह : सामर्थ्य आहे तुझ्यातही), भीमराव लक्ष्मण शिरसाठ बुलढाणा (दिव्यांग सेवा पुरस्कार : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ,मुंबई) यांचा समावेश आहे. या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष समाधान दहिवाळ यांनी सांगितले.

*उषा हिंगोणेकर यांच्या “धगधगते तळघर” या कवितासंग्रहाला यमुनाताई नाथोबा दहिवाळ” उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार घोषित झाला आहे .प्रशांत पब्लिकेशन्स जळगावने हा कविता संग्रह 1 जाने. 2021 ला प्रकाशित केलाय. डॉ यशवंत मनोहर यांची लक्षवेधक धी प्रस्तावना लाभलेली आहे.उषा हिंगोणेकरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे*


