समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सलोखा व शांतता प्रस्तापित करा – डिवाएसपी सोमनाथ वाघचौरे : शांतता समिती बैठकीत केले आवाहन –


भुसावळ- समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सलोखा व शांतता प्रस्तापित करा असे आवाहन करीत काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजात जातीय तेढ निर्माण करत असतात, यामुळे विनाकारण अघटित व अप्रिय घटना घडून येतात म्हणून आग लावण्या पेक्षा नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमिवर शहरातील रिंग रोड परिसरातील शिखर संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी न.पा.चे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, मशिदीचे मौलाना सलमान मेमन, हाफीज रफीक, मुक्ती जावेद, अब्दुल हमीद नईमी, हाफीज गुलाम सरवर, अनिस अहमद किफायती, रेहान रजाक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. वाघचौरे यांनी अफवांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगत मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जातीय सलोखा जतन करा तसेच कोरोना लसीकरणा बाबतीत कोणताही गैरसमज न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रसंगी डॉ. कीर्ती फलटणकर, शिखर संस्थेचे सचिव रफीक शेख, मुजाहीद तडवी, मो. सैय्यद, शकील खान, सैय्यद रशीद, इम्रान शेख, अफताफ शेख, डॉ. तारीख, डॉ. इजहार, डॉ. इम्रान यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.