किन्ही ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण: चौकशीस आलेल्या अधिकाऱ्याना विना चौकशी परतावे लागले ; ग्रा. प. बंद – ग्रामसेवक गैरहजर :


भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथे ग्रामपंचायतने पद भरती प्रक्रिया नुकतेच काही महिन्यापूर्वी करण्यात आली होती ,मात्र सदर भरती ही वशिलेबाजी करून नियमात न बसता केलेली आहे असा आरोप विश्‍वजित मोरे,हर्षल येवले, हर्षल बोंडे, या उमेदवारांनी केला होता. तसेच गट विकास अधिकारी यांना पद भरतीची चौकशीचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांनी दिले होते.
8/ 11 /-2021 रोजी चौकशी करण्याचे तोंडी आदेश दिले परंतु कोणताही अधिकारी चौकशी साठी आला नाही 17 -11 2021 रोजी चौकशीचे लेखी आदेश ग्रामसेवक संदीप निकम यांना दिले परंतु 17 /11 /2021 रोजी चौकशी कामी पंचायत समिती भुसावळ येथील विस्ताराधिकारी पाटणकर, सहाय्यक अधिकारी कैलास काळे, कनिष्ठ अधिकारी पंचायत समिती भुसावळ राजेंद्र फेगडे, आदीं माहिती व चौकशीसाठी दुपारी 12:30 ला ग्रामपंचायत किन्ही येथे आले असता ग्रामसेवक संदीप निकम ग्रामपंचायत बंद करून निघून गेले होते.यामुळे संबंधित अधिकारी यांना विना चौकशी परतावे लागले
दरम्यान या प्रकरणी गटविकास अधिकारी यांनी पुन्हा 23- 11- 20 21 रोजी 11वाजता चौकशीचे आदेश दिलेले आहे.
या चौकशी कडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे ग्रामसेवक निकम हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नसून चौकशी कामी ग्रामपंचायत येथे हजर राहत नाही. यावरून लक्षात येते की यांनी कर्मचारी पद भरती करताना नियमात न बसता बोगस भरती केलेली आहे. तरी या प्रकरणासाठी गेली दोन महिन्यापासून चौकशीसाठी आम्ही फिरत असून आम्हाला न्याय मिळालेला नाही. तरी आपण आपल्या स्तरावरून व जातीने लक्ष घालून लवकरात लवकर या बोगस कर्मचारी भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक संदीप निकम यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन विश्‍वजित मोरे, हर्षल ठेवले, हर्षल बोंडे, यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) व गट विकास अधिकारी भुसावळ यांना दिले आहे