भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठा तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
तंत्रशास्त्र विद्यापिठा तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष परीक्षेतील शाखानिहाय गुणवंत प्रथम, द्वितीय व तृतीय ह्या क्रमाने मिळवलेल्या सी.जी.पी.ए.(CGPA) गुणांनुसार पुढीलप्रमाणे,
सिव्हिल इंजिनीअरिंग
भावना बावीस्कर (9.17), अरविन्दसिंह (9.12), जान्हवी शेंडे (9.07)
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग
सय्यद ताहेरीम फातेमा झाकी अहमद (9.38), रूत्विका पाटील (9.36), ओशी संजीव जैन व रक्षा अत्तरदे (9.35)
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
श्रद्धादेवी (9.27), तेजस कुलकर्णी (8.91), अरबाज अशफाक शेख (8.89)
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
हरिष बेंडाळे (8.89), विशाखा भोळे व जयश्री बैरागी (8.87), जुनेद तडवी (8.80)
मेकॅनिकल इंजिनीअरिंग
साहिल नन्नवरे (9.35), अक्षय पाटील (8.99), प्रद्युम्न शर्मा (8.98)
समतोल व्यावसायिक गुणवत्ता असणारे आणि उद्योगस्नेही अभियंते घडवण्याकडे महाविद्यालयाचा कल असतो आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी मिळवलेले गुण आणि यंदा झालेले प्लेसमेंट ह्या बाबी एकूणच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची खात्री देतात असे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ. आर.बी.बारजिभे, डॉ. पंकज भंगाळे, प्रा.ए.व्ही.पाटील, डॉ.एस.बी.ओझा, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ.डि.डि.पाटील, प्रा.ए.पी.चौधरी यांनी यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिंनींचे कौतुक केले आहे.



