भुसावळ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लावण्याचे सूचित करणारा शासन निर्णय काढूनही अजूनही . शासन निर्णयाचीच महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शासकीय कार्यालयांकडून याबाबत पायमल्ली होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र मुख्यमंत्री, राज्यमंत्री आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लावण्याचे सूचित करणारा शासन निर्णय ६ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्व कार्यालयांत पाठविण्यात आला होता. यापूर्वीही कोणत्या थोर पुरुषांची छायाचित्रे लावायची, याबाबत वेळोवेळी शासननिर्णय काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. १९५८, १९६२, १९८२ आणि १९८५ मध्येही शासन निर्णय काढण्यात आले होते. १९८५ च्या शासन निर्णयानुसार, छायाचित्रांमध्ये सात थोर पुरुषांचा समावेश होता. आता ही संख्या २९ वर गेली आहे.

छायाचित्र लावणे अनिवार्य असतानाही राज्यातील बऱ्याच अशा विविध जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपरिषदा नगरपालिका नगरपंचायत आणि प्रशासकीय इमारतींमध्ये या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे अशा कार्यालयांना कधी येणार शिस्त? tवैयक्तिक श्रद्धा बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करून थोरांची छायाचित्रे लावण्याबाबत शिस्त असावी, यासाठी शासनाने निर्णय काढले. महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, फक्रुद्दीन अली अहमद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, दादाभाई नौरोजी, व्ही. व्ही. गिरी, महात्मा जोतिबा फुले, राजीव गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. झाकीर हुसेन, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, वसंतदादा पाटील, डॉ. एस. राधाकृष्णन, छत्रपती शिवाजी महाराज, अटलबिहारी वाजपेयी, के. आर. नारायणन, सावित्रीबाई फुले, डॉ. मनमोहन सिंग, राजर्षी शाहू महाराज, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, रामनाथ कोविंद यांच्याही नावांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. . मात्र, अजूनही महाराष्ट्र राज्यातील बरेचसे अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये याबाबत अद्यापही निद्रावस्थेतच असल्याचे चित्र आहे. हा एक प्रकारे या सर्व थोर महापुरुष, राष्ट्र्पती, पंतप्रधान यांचा वएक प्रकारे अपमान होत आहे. आणि असा अपमान करणाऱ्या व या बाबतीतल्या शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या उल्लंघन करणाऱ्या सर्व समस्त शासकीय, निमशासकीय कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व अशा या सर्व थोरमहा पुरुषांसह माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी यांच्या प्रतिमा संबंधित कार्यालयांमध्ये शासनाचा याबाबतीत निर्गमित आदेशाचे त्वरित पालन करून सक्तीने लावण्यास भाग पाडावे. अशी मागणी साई निर्मल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


