- भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील जितेंद्र बळीराम आहुजा यांच्या मालकीच्या अशोक हार्डवेअर दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे आठ लाखांचे साहित्य लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गजबजलेल्या मार्केटमध्ये चोरी झाल्यानंतर व्यापार्यांमध्ये धास्ती पसरली आहे.
अशोक हार्डवेअरच्या पाठीमागे असलेल्या लहान लाकडी खिडकीतून प्रवेश करीत नळ फिटींगच्या साहित्यासह अन्य साहित्य मिळून सुमारे आठ लाखांचे साहित्य लांबवले. दुकानातील 10 सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर देखील चोरट्यांनी लांबवल्याने सराईत चोरटे असल्याची शंका आहे. शुक्रवारी सकाळी दुकानातील कामगार दुकानावर सामान घेण्यासाठी आले असता दुकानात पाहिले असता दुकानातील सर्व सामानांची फेकाफेक झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दुकान मालकाला चोरीची माहिती दिली.



