भुसावळ-
शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना साठा जप्त करून गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
शहरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्या घरांमध्ये छापेमारी केली. या कारवाईत मुस्लीम कॉलनी भागातील ईदगाह समोर राहणारा शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे मोठा शास्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली.

याची खातरजमा करून पथकाने छापा मारला असता शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये मोठा साठा मिळाला. यात चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदूक आदींचा समावेश आहे. पोलीस पथकाने हा साठा जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुरनं ३४२/२०२१ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत.


