कामागारांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार – मुख्य अभियंता विजय राठोड :


दीपनगर –
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही भुसावळ औष्णिक वीज केंद्रात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांनी सत्कारप्रसंगी दिली. औष्णिक वीज केंद्रात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांचा सत्कार श्रमिक सेवा संघटनेतर्फे करण्यात आला.

 यावेळी प्रांतीय अध्यक्ष यासीन खान पठाण, प्रांतीय उपाध्यक्ष सुरेश वरणकर, प्रांतीय सचिव सचिन भिरूड, स्थानिक अध्यक्ष निश्चल झोपे, सचिव विनोद भिरूड, संघटनेचे सभासद पंकज चौधरी, पतंग माने, नितीन कोळी, शे.मुस्तफा, समाधान सपकाळे, अमोल बर्‍हाटे, किरण बर्‍हाटे, सचिन चौधरी, सचिन बोरोले, राकेश भिरूड व महिला प्रतिनिधी कांचन भारंबे व कोल्हे आदी उपस्थित होते. या प्रसंगी मुख्य अभियंता राठोड यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले जातील त्याचप्रमाणे सुरळीत वीज निर्मितीसाठी कामगारांनी प्रयत्न केले पाहिजे तरच वीज निर्मितीचा उच्चांक गाठला जावू शकतो, असे सांगितले.