पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर –

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार, 30 जुलै, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा, सकाळी 10.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून किनोद, ता. जळगावकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता किनोद, ता. जळगाव येथे आगमन व नियोजीत कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 12.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून चोपडाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा तालुक्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे प्रयाण व राखीव.