भुसावळ – कोल्हापूरात पूराचा कहर सुरू असल्याने गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी आता कोल्हापूरपर्यत जात नसून ही गाडी मिरजपर्यतच जात आहे. राज्यात पाऊस सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी कोल्हापूरपर्यत जाते मात्र कोल्हापूरातील पूरस्थितीमुळे ही गाडी मिरजपर्यतच जात आहे. ही कोल्हापूरातील पूरस्थिती ओसरल्यावर ही गाडी कोल्हापूरपर्यत पूर्ववत होणार आहे. आता ही गाडी मिरजपर्यतच धावत आहे, तेथूनच परतीचा प्रवास या गाडीचा होतो.



