पुराच्या पाण्यात बैलगाडीसह शेतकरी वाहिला : महिलेचे वाचले प्राण :


जळगाव –
निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी वाहुन गेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या घटनेत महिला सुदैवाने पुरातून बचावली मात्र शेतकरी अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. भागवत भिका पाटील (55) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (50, रा.निंभोरा, ता. धरणगाव) सह बैलगाडीने खैर्‍या नाल्यातून शेतातून घराकडे परतत असतांनाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढला व बैलगाडी पाण्यात वाहिली पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने बैलगाड़ी वाहिली तर मालूबाई यांनी एका झाडाला पकडून ठेवल्याने त्या बचावल्या मात्र भागवत पाटील मात्र वाहून गेले.
नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले असून बाजूला बैलगाडी सुद्धा आढळली आहे.