भुसावळात एकाच एजन्सीला काम : दिनेश उपाध्याय यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार –

भुसावळ

  • शहरात पालिकेच्या माध्यमातून विविधांगी सुरू असलेल्या विकासकामांची निविदा एचएमटी नामक एजन्सीला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने या संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास विभागाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारींची दखल घेत नगरविकास विभागाला दखल घेण्यासंदर्भात आदेश दिल्याचे उपाध्याय म्हणाले.
    शहरातील उद्यानाचे बांधकाम, गटारीचे बांधकाम, सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्याचे बांधकाम आदी कामे संबंधित एजन्सीधारक एकाच आय.पी.अ‍ॅड्रेसवरून निविदा भरून स्वतः काम करून घेत असल्याचा आरोप उपाध्याय यांनी तक्रारीत केला आहे. संबंधित एजन्सीला दिलेल्या कामांची गुणवत्ता तपासणी नाशिक किंवा मुंबईच्या प्रतिनिधी करावी
    तसेच निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यास या एजन्सीला कायम स्वरूपी ब्लॅकलिस्टेट करावे व कंत्राटदारा विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी तक्रारीन्वये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *