पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;


भुसावळ –
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त माजी शिवसेना नगरसेवक दीपक धांडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शिवसेना जुना सातारा विभागीय कार्यालयात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे पालकमंत्री यांच्या वाढदिवसावर अवास्तव खर्च न करता दीपक धांडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी आमदार दिलीप भोळे, कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, तालुका युवाअधिकारी हेमंत बऱ्हाटे, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, शहर संघटक योगेश बागुल, माजी नगरसेवक कैलास लोखंडे, ऍड. नरेंद्र लोखंडे, विभागप्रमुख अमोल पाटील, ऍड. निर्मल दायमा, शाखाप्रमुख पिंटू भोई, प्रसिध्दीप्रमुख गोकुळ बाविस्कर, विक्की चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *