जळगाव दी 31

- जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज सोमवार, दि. 31 मे 2021 रोजी मुंबईला जाऊन प्रथमच राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांना जळगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. तसेच आपण जळगावच्या विकासासंदर्भातील सर्व प्रलंबित विषयांची यादी घेऊन पुढील आठवड्यात पुन्हा या. सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर भरीव मदत करू, असे आश्वस्त करीत सूचना केली. याप्रसंगी त्यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशीही यासंदर्भात फोनवरून संपर्क साधला.
यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, शिवसेनेचे रावेर तालुका संपर्कप्रमुख विलास पारकर, उपमहापौर कुलभूषण पाटील, गजानन मालपुरे, नगरसेवक ललित कोल्हे, सौ.सरिता माळी-कोल्हे, अतुल बारी, शफू पेंटर, मोहन म्हसळकर, नगरसेवक सुरेश सोनवणे उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आज नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासह विविध प्रलंबित विषयांवर चर्चा केली. त्यावर मंत्री श्री.शिंदे यांनी त्यांना आपण जळगावच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निधी, गाळ्यांचा प्रश्न, जळगाव महानगरपालिकेचा महसूल वाढविणे आदी प्रलंबित विषयांची यादी घेऊन पुढील आठवड्यात पुन्हा मुंबईला या. या भेटीदरम्यान सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर भरीव मदतीचा मार्ग काढू, असे आश्वस्त करीत सूचना केली.
…………………..


