भुसावळ –
शहरातील जामनेर रोडवरील बद्रीप्लॉट केंद्रावर मंगळवार, 1 जून रोजी कोवॅक्सीन लसीचे 45 वर्षावरील नागरिकांना दुसर्या डोसचे लसीकरण सकाळी नऊ ते पाच या वेळेत होणार आहे. यासाठी 150 डोस उपलब्ध झाले असून डोस संपताच लसीकरण केंद्र बंद केले जाणार आहे. दरम्यान, शहरातील नगरपालिका मुख्य दवाखाना, वरणगाव रोड आरोग्य केंद्र, खडका रोड आरोग्य केंद्र व महात्मा फुले नगर केंद्र येथे लसीकरण बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.



