जळगाव –
जळगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या निर्णायक पाठपुराव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उसळलेल्या गर्दीत शासकीय नियमांचे उल्लंघण झाल्याप्रकरणी अखेर शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
24 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, 25 मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी शेकडो लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले व जिल्ह्यातील मान्यवर नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थित असल्याने फिजीकल डिस्टन्सींगच्या फज्जा उडाला. प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का ? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल अॅक्टीव्हीस्ट दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ट्विटरवरून प्रशासनाला विचारला त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले. प्रशासनाने याबाबत दखल घेत एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक आणि फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह अन्य 50 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
निधनाचे दुःख मात्र नियम सर्वांना समान हवा : गुप्ता
हाजी साहेब हे सर्वमान्य नेते असल्याने त्यांच्या निधनाचे दुःख झाले मात्र नियम हा सर्वांसाठी सारखा असावा, अशी आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले.



